समाजातील शेवटच्या माणसाचा आवाज देखील संसदीय प्रणालीत बुलंद झाला तरच लोकशाही व्यवस्था चिरंतन राहू शकते. यामुळेच जनतेच्या हिताचे, जिव्हाळ्याचे मुद्दे लोकसभेत मांडण्याचा मी सदैव प्रयत्न करीत असते. ही प्रक्रिया आता आणखी सोपी व लोकाभिमुख व्हावी, आपले विषय मला लोकसभेत मांडता यावेत यासाठी हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत तुम्ही मला तुमच्या सुचना, प्रश्न आणि विषय थेट पाठवू शकता. आपण मला पाठविलेले महत्त्वाचे मुद्दे, सुचना, विषय मी संसदेत मांडण्याचा प्रयत्न करेन. यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कृपया आपण आपले प्रश्न, विषय नक्की पाठवावे ही नम्र विनंती.

धन्यवाद,
सुप्रिया सुळे

Citizen Engagement is extremely important in legislation and public policy making processes.

In order to ensure that everyone’s voices are taken into consideration, I actively engage with citizens, organisations & stakeholders and would continue to do so.

To make the process more easier the following platform is made available to all. Requesting everyone to send their questions, issues, and feedback on legislation and public polices on this website.

I will do my best to raise important concerns in the Parliament.

Thank you,
Supriya Sule